पुण्यातील नवी पेठेतील शिवोदय गणेश मंडळात देशी वृक्षांचे वाटप असा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज असल्याने माय अर्थ फांउडेशन, लायन्स क्लब, शिवोदय मित्र मंडळ आणि अण्णासाहेब डांगे शिक्षण संस्था, वाई यांच्यावतीने वसुंधरा गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील गांजवे चौकाजवळील शिवोदय गणेश मंडळामध्ये एक हजार देशी वृक्षांचे आणि बियांचे वाटप करण्यात येत आहे.